Raut Vs Somaiya: माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक व्हायला हवं होतं - संजय राऊत

Sanjay Raut On Kirit Somaiya: किरीट सोमय्यांबद्दल मी किरीट सोमय्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली त्याचं मला आणि शिवसेनेला कौतुक आहे असं राऊत म्हणाले.
My offensive and bad language should be appreciated said Sanjay Raut on kirit somaiya
My offensive and bad language should be appreciated said Sanjay Raut on kirit somaiyaSaam TV

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राऊत (Sanjay Raut) सध्या सोमय्याविरोधात (Kirit Somaiya) अतिशय शिवराळ भाषा वापरत आहेत, याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कालच्या उत्तर सभेबाबत बोलताना त्यांनी राज ठाकरेंना भाजपचा भोंगा असं म्हटलं आहे. (My offensive and bad language should be appreciated said Sanjay Raut on kirit somaiya)

हे देखील पहा -

राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिलेल्या भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमबाबत राऊत म्हणाले की, अल्टिमेटम देण्याची तादक फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. बाळासाहेब ठाकरेंनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिला होता. राज ठाकरे हे भाजपचाच भोंगा आहे. जे आमच्याशी थेट लढू शकत नाही ते असे भोंगे उभे करतात. आम्ही खोट्या कारवायांविरोधात लढतोय असं म्हणत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच शिवसेना आणि महाविकास आघाडी ही भक्कम आहे असंही ते म्हणालेत.

शिवराळ भाषेबाबत ते म्हणाले की, संजय राऊत हे शिवराळ भाषा वापरतात. माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक व्हायला हवं होतं, कारण ते मराठी अभिमानासाठी होतं. किरीट सोमय्यांबद्दल मी किरीट सोमय्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली त्याचं मला आणि शिवसेनेला कौतुक आहे, यााबाबत मी मुख्यमंत्र्याशीही बोल्लो आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या हे मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीची सक्ती होऊ नये यासाठी सोमय्या कोर्टात गेले होते. मुंबईला महाराष्ट्रापासू वेगळं करण्यासाठी सोमय्या आणि त्यांचे बिल्डर मित्र दिल्लीत लॉबिंग करतात, प्रेझेंटेशन करतात असा आरोपही त्यांना केला आहे. किरीट सोमय्याला तुमच्या शीवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि शॉल-श्रीफळ देऊन सत्कार करा असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

My offensive and bad language should be appreciated said Sanjay Raut on kirit somaiya
Satara: मनसेचा हिंदुत्ववादी मुद्दा निवडणुकीत चालणार नाही : रामदास आठवले

दिवा विझताना जास्त फडफडतो तसं हा भोंगा वाजतोय. तुमच्या तोंडाला दुसऱ्या पक्षाचा झेंडा आहे असा टोला त्यांनी मनसेला लगावला. किरीट सोमय्या ज्यांनी आयएनएस घोटाळा केलाय त्या किरीट सोमय्याला शिव्या दिल्या असंही ते म्हणाले. विक्रांतच्या नावाखाली देशद्रोही असलेल्या किरीट सोमैय्याला मी शिवी घातली. ज्याला ज्या भाषेत कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे, असे अत्रे आणि बाळासाहेब यांनी आम्हाला शिकवले होते, त्यामुळं आम्ही त्याच भाषेत बोलणार. तुम्ही तुमचे दैवत बदलले असेल, तुम्ही तुमचा म्हसोबा बदलाला असेल आम्ही नाही असंही राऊत म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com