आर्यन खानला क्लीन चिट मिळताच नवाब मलिकांचं ट्विट, म्हणाले...

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला आज कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे.
Nawab Malik
Nawab MalikSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला आज कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. आर्यन खानला (Aryan Khan) क्लीन चिट मिळताच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कार्यालयाकडून समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याबाबतचं एक ट्विट करण्यात आलं आहे. तसंच मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी 'सत्याचा नेहमी विजय होतो' असं ट्विट (Tweet) केलं आहे.

मुंबईतल्या कार्डिलिया क्रूझमधील पार्टीमध्ये (Cordelia Cruise) अमली पदार्थांचं सेवन तसंच खरेदी-विक्री केल्याप्रकरणी आर्यन खानसह त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना देखील एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. आर्यनच्या अटकेनंतर एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरती नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. तसंच वानखेडे यांनी ही कारवाई खंडणी वसूल करण्यासाठी केल्याचा आरोप मलिकांनी केला होता. दरम्यान याच प्रकरणावरुन मलिक विरुद्ध वानखेडे असा वाद जोरात रंगला होता.

या सर्व घडामोडीनंतर काही आठवड्यांनी आर्यन खानची क्रूझ ड्रग्ज प्रकरणी जामिनावर सुटका करण्यात आली होती. दरम्यान, याबाबतचा खटला मुंबई सत्र न्यायालयात सुरू होता. आता याच प्रकरणातलं पहिलं आरोपपत्र आता दाखल करण्यात येत असून त्यातून आर्यन खान आणि इतर सहा जणांची नावं वगळण्यात आल्याची माहिती समोर येताच मलिक यांच्या मुलीसह मलिक यांच्या ट्विटरवरुन ट्विट करण्यात आलं आहे.

मलिकांच्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, आता आर्यन खान आणि इतर ५ जणांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे NCB आता समीर वानखेडे यांच्या टीमवर आणि वानखेडे यांच्या खाजगी सैन्यावर कारवाई करणार का? की गुन्हेगारांना संरक्षण देणार? असा प्रश्न उपस्थित करणार ट्विट केलं आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्यावर एनसीबी काही कारवाई करणार का? तसंच वानखेडे यांच्यांवर एनसीबीकडून काही कारवाई करण्यात येणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. तसंच त्यांच्यावर आर्यन खानवर ड्रग्ज प्रकरणातील कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसंच वानखेडे यांनी चौकशी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com