police, local crime branch, nevasa, nagar
police, local crime branch, nevasa, nagar Saam Tv

Ahmednagar LCB News: शेतकऱ्यांच्या वेशात पोलिसांनी लावला सापळा... टप्प्यात येताच सराईत गुन्हेगाराला पकडले, सहा गावठी कट्टे जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुकाणे गावात सापळा लावला होता.

- सुशिल थोरात

Ahmednagar News: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरमध्ये (nagar local crime branch) सहा गावठी कट्टे जप्त केले. या प्रकरणी भैय्या शेख या संशयितास पाेलिसांनी (police) अटक (arrests) केली आहे. त्याच्याकडून एक लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

police, local crime branch, nevasa, nagar
Parshuram Ghat Traffic Update : परशुराम घाटातील वाहतुक सुरु; Social Media तील पत्रामुळे उडाला गाेंधळ

नेवासा येथे विक्री करण्याचे उद्देशाने सहा गावठी कट्टे आणि 12 जिवंत काडतुस अवैधरित्या बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.

हे गावठी कट्टे कुठून आणले याचा तपास पोलीस करत आहे. या आठवड्यात गावठी कट्टे पकडण्याचा अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुकाणे गावात सापळा लावला होता.

police, local crime branch, nevasa, nagar
Angry Farmer : शेतमालास भाव नाही, संतप्त शेतकऱ्याने उभ्या पिकात साेडली जनावरं (पाहा व्हिडीओ)

यावेळी काही पोलिसांनी शेतकऱ्यांच्या वेषात शेतात काही वेळ कामही केले. त्यानंतर संशयित आरोपी टप्प्यात येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. गावठी कट्ट्यासह पकडण्यात आलेल्या भैय्या शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हयाची नोंद असून तो अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com