
नगर : अहमदनगर (ahmednagar) शहरातील सिटी केअर हॉस्पीटलच्या (city care hospital) पार्किंगमधून (parking) तीन लाख ३० हजारांची चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) कर्मचा-यांनी अटक (arrest) केली आहे. (nagar latest marathi news)
या रुग्णालयात उपचारासाठी आणलेले पैसे अचानक चोरीला गेल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंता पसरली होती. नगरच्या (nagar) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (lcb) २४ तासांत पैसे चाेरणा-यास जेरबंद केले. एलएसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके (anil katke) यांनी संबंधित चाेरट्याकडून तीन लाख पंधरा हजारांची रक्कम हस्तगत केली.
रमेश रामु कोळी असे संशयित आरोपीचे नाव आहे. रमेश हा मूळचा आंध्रप्रदेश (andhra pradesh) येथील रहिवासी आहे. लाखाे रुपये परत मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांचा फेटे बांधून सत्कार केला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.