Body Builder Death : नालासोपाऱ्यात २७ वर्षीय बॉडी बिल्डरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Nalasopara Body Builder Dies : अजिंक्य कदम असं या बॉडी बिल्डरचं नाव आहे.
Ajinkya Kadam
Ajinkya KadamSaam TV

Nalasopara News :

बदलती लाईफस्टाईल यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक दु:खद घटना मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यातून समोर आली आहे.

नालासोपाऱ्यातील एका २७ वर्षीय बॉडी बिल्डरचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या बॉडी बिल्डरचं निधन झालं आहे. अजिंक्य कदम असं या बॉडी बिल्डरचं नाव आहे. (Latest Marathi News)

Ajinkya Kadam
Air Hostess Killed Case : २३ वर्षीय एअर हॉस्टेसच्या हत्येचं कारण आलं समोर, CCTVमुळे आरोपी क्लीनर पोलिसांच्या जाळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अचानक अजिंक्यच्या छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागलं होते. कुटुंबियांनी तातडीने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचाराआधीच त्यांचं निधन झालं. डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने अजिंक्यचं निधन झालं आहे.

Ajinkya Kadam
Navi Mumbai Accident : अचानक ब्रेक मारल्याने NMMT बसला मागून धडक, वाहन चालकाने थेट तलवारच बाहेर काढली

मुंबई परिसरात बॉडी बिल्डर म्हणून अजिंक्यचं मोठं नाव होतं. अनेक स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेऊन पारितोषके देखील पटकावले होते. अजिंक्य अविवाहित होता. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अजिंक्यच्या असं अचानक जाण्याने कुटुंबियांना आणि मित्र परिवारालाही धक्का बसला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com