Crime News: धक्कादायक! प्रेयसीच्या शरीरावर रॉकेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी प्रियकर अटकेत

या हल्ल्यामध्ये प्रेयसी जखमी झाली असून ती ७० टक्के भाजली आहे. तसेच तिला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Crime News
Crime NewsSaam tv

Nalasopara News: सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच नालासोपाऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्व धील प्रगतीनगर परिसरात शुभम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संतोष पांचाल या प्रियकराने आपल्यासोबत राहणाऱ्या प्रेयसीला रॉकेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News Update)

Crime News
Political News : विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आमदारांचा आक्षेप; विधीमंडळाने घेतला मोठा निर्णय

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष पांचाल हा आपल्या प्रेयसीबरोबर लॉकडाऊन पासून एकत्र राहत होता. लॉकडाऊनच्या आधी या दोघांची ओळख झाली होती. त्याची प्रेयसी आमिषा पांचाल (३७) हीचे आधीच लग्न झाले असून तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ती संतोष बरोबर आपल्या तीन मुलांसह लिव्हइन मध्ये राहत होती. संतोष हा रिक्षाचालक आहे.दोघांमध्ये आर्थिक अडचणीतून नेहमी वाद होत असे .

Crime News
Vande Bharat Express : धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चहासोबत कालबाह्य तारखेची बिस्किटे; प्रवाशांचा संताप

घटनेच्या दिवशी म्हणजेच सात तारखेच्या रात्री दोघांमध्ये नेहमी सारखं भांडण झाले. मात्र हा वाद विकोपाला गेला. यावेळी रागाच्या भरात संतोषने आमिषाच्या शरीरावर रॉकेल ओतले व तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये आमिषा गंभीर जखमी झाली असून ती ७० टक्के भाजली आहे. तसेच तिला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com