शौचालयास गेली अन् परतलीच नाही; १५ वर्षीय मुलीसोबत घडली भयंकर घटना

दीक्षा यादव असं वाहूून गेलेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे.
Diksha Yadav Nalasopara News
Diksha Yadav Nalasopara NewsSaam TV

नालासोपारा : गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी पाणी साचलं असून नदी-नाल्यांना पूर आलाय. अशातच नालासोपारा येथे शौचालयासाठी गेलेली एक १५ वर्षीय मुलगी नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तीचे शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. (Mumbai Nalasopara Latest News)

Diksha Yadav Nalasopara News
Nandurbar News : मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले; अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

मंगळवारी सकाळपासूनच नालासोपारा शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभरातही पावसाने आपला जोर कायम ठेवला. यामुळे परिसरातील नाले भरून वाहू लागले. अशातच नालासोपारा धाणीवबाग परिसरात राहणारी १५ वर्षीय दीक्षा यादव घराजवळील नाल्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार दीक्षा ही धाणीवबाग येथिल सिद्धीविनायक चाळीत राहत होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास ती घराजवळील शौचालयात गेली होती. हे शौचालय नाल्याला लागूलच आहे. परत येताना पावसाने जमीन ओली असल्याने तीचा पाय घसरला आणि तोल जाऊन ती नाल्यात पडली. पावसामुळे नाला अधिक प्रवाहाने वाहत असल्याने ती प्रवाहाबरोबर वाहत गेली. (Nalasopara Rain News Today)

Diksha Yadav Nalasopara News
थरारक! पुराच्या पाण्यात पिकअप गेली वाहून; चालकासह २ जण बुडाल्याचा अंदाज

सदर घटनेने पुन्हा एकदा उघड्या नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण मागील आठवडाभरात उघड्या नाल्यात वाहून गेल्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर महापालिकेचा सफाई कर्मचारी उघड्या नाल्यात वाहून गेला होता. आठ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. तर मागच्या वर्षी उघड्या नाल्याचा शिकार ठरलेला ८ वर्षीय अमोल सिंग याचा अजूनही पत्ता लागला नाही.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com