Mumbai : धक्कादायक! जीम ट्रेनरचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू

नालासोपऱ्यातील धक्कादायक घटना
Nalasopara Gym Trainer
Nalasopara Gym Trainer Saam Tv

Nalasopara Gym Trainer : वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरयष्टी बनवण्यासाठी आपण जीमचा पर्याय निवडतो. पण व्यायामासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी, कोणता आहार घ्यावा, स्टेरॉयड्स घेणं किती धोकादायक ठरू शकतं का? याविषयी मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. चांगली शरीरयष्टी बनवण्यासाठी आपल्यला ट्रेनर चांगले प्रशिक्षण देत असतो. पण, नालासोपऱ्यामध्ये एका जिम ट्रेनरचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Nalasopara Gym Trainer
Maharashtra : एकतरी मुसलमान दाखवा ज्याने आपल्या मुलाचे नाव..., भाजप मंत्र्याचा एनसीपी नेत्यास कडवा प्रश्न

नालासोपारा पश्चिम, यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देविदास विनायक जाधव (वय ३५) याला १ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी तसेच बिल्डिंग मधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

याबाबत रविवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विनायक जाधव हे एक जीम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील 'द फिटनेस कार्डेस' या जीम मध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Nalasopara Gym Trainer
Laxman Jagtap : राजकारणत ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला; फडणवीसांनी व्यक्त केली शोकसंवेदना

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम भागात ही घटना घडली आहे. देविदास विनायक जाधव (वय ३५) असं मृत ट्रेनरचं नाव आहे. यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. आज सकाळी अचानक देविदास जाधव यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com