Bhima-Koregaon case: संभाजी भिडेंचं नाव चार्जशीटमधून वगळलं; सूत्रांची माहिती

संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणतेच ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Bhima-Koregaon case: संभाजी भिडेंचं नाव चार्जशीटमधून वगळलं; सूत्रांची माहिती
Sambhaji BhideSaam TV

पुणे : भिमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी (Police) दाखल केलेल्या आरोप पत्रात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) यांचे नावच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणतेच ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Bhima-Koregaon case)

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide : भारताला गांधी नावाची बाधा - संभाजी भिडे

पुणे पोलिसांनी याबाबतचे पत्र मानवी हक्क आयोगाला दिले आहे. या पत्रात संभाजी भिडे यांचे आरोपपत्रात नाव नसल्याचे म्हटले आहे. संभाजी भिडेंना वगळून ४१ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरण नेमकं काय?

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या एल्गार परिषदेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला, असा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले होते. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला होता.

कोरेगाव-पुणे हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास करुन १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाचा सध्या तपास एनआयए करत आहे. एनआयएने २४ जानेवारी २०२० रोजी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर १४ एप्रिल रोजी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांना अटक केली.

दरम्यान कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.