राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांत बदल; 'या' नेत्याचे नाव वगळले
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांत बदल; 'या' नेत्याचे नाव वगळलेSaam Tv

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांत बदल; 'या' नेत्याचे नाव वगळले

काल राज्यपाल आणि राज्य सरकार मध्ये झालेल्या बैठकीत आमदारांची पुन्हा यादी देण्यात आली आहे.

मुंबई - अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न तो म्हणजे राज्यपाल Governer नियुक्त १२ आमदारांचा. या मुद्यावरुण अनेकदा राज्यपाल आणि राज्य सरकार State Government आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजीत पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांच्या भेटीला गेले होते.

हे देखील पहा -

या १२ आमदारांच्या नियुक्यांचा तिढा सुटणार का? याकडे राजकीय वर्तुळात चर्चा होती. मागे राज्यपालांना भेटण्यावरुन मोठा घोळ झाला होता तेव्हा ही भेट टळली होती. १२ आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांकडे देवून ९ महिन्यांच्यावरचा कालावधी गेला आहे. काल राज्यपाल आणि राज्य सरकार मध्ये झालेल्या बैठकीत आमदारांची पुन्हा यादी देण्यात आली आहे. कारण राष्ट्रवादी कडून राजू शेट्टी Raju shetty यांचं नाव वगळण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला असला तरी राजू शेट्टी हे सरकार विरोधात पदयात्रा करत आहेत.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांत बदल; 'या' नेत्याचे नाव वगळले
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आर्थिक परवड; मंदिर बंद असतानाही भरले 71 लाखाचे वीज बिल

राज्य सरकारकडे देण्यात आलेली जुनी नावे

उर्मिला मातोडकर- शिवसेना

विजय करंजकर- शिवसेना

चंद्रकांत रघुवंशी- शिवसेना

नितीन बानगुडे पाटील- शिवसेना

आनंद शिंदे- राष्ट्रवादी

एकनाथ खडसे- राष्ट्रवादी

राजू शेट्टी- राष्ट्रवादी (हे नाव वगळले आहे.)

यशपाल भिंगे- राष्ट्रवादी

सचिन सावंत- काँग्रेस

रजनी पाटील- काँग्रेस

मुजफ्फर हुसेन- काँग्रेस

अनिरुद्ध वनकर- काँग्रेस

सुधारित यादीबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com