नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक

नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र, शेतकरी हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक
नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमकप्रदिप भणगे

डोंबिवली : नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्र, शेतकरी हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कल्याण ग्रामीण, दिवा, मलंगगड, 14 गावे आणि डोंबिवली ग्रामीण परिसरात आज मशाल मोर्चा काढण्यात आला.

नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आगरी, कोळी , कुणबी, कराडी तसेच स्थानिक भूमीपुत्रांनी 10 जूनला मानवी साखळी आंदोलन केले. यानंतर 14 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता साधारण 350 गावात मशाल मोर्चा काढण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी कल्याण ग्रामीणचे नागरिक पुन्हा आक्रमक
बापरे! नगरपालिका कार्यालयात रंगली गटारी अध्यक्षांचे दालन बनवले परमीट रुम

स्व. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत. ही मागणी सरकारने मान्य केली नाहीतर येत्या 16 ऑगस्टला विमानतळाचे काम बंद पाडण्यात येईल अशी घोषणा धसई गावात झालेल्या बैठकीत एकमताने भूमीपुत्रांनी आणि कमिटीचे दशरथ पाटील यांनी केली असल्याचे 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com