NAMO Shetkari Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! नमो शेतकरी योजनेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana: केंद्र व राज्य असे दोन्ही मिळून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
Namo Shetkari Yojana
Namo Shetkari YojanaSaam TV

Mumbai News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खूशखबर मिळू शकते. शेतकऱ्यांसाठीच्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर आज मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे वर्षाला 6 रुपये मिळतात. यासोबत आता नमो शेतकरी योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना अतिरक्त सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. केंद्र व राज्य असे दोन्ही मिळून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

Namo Shetkari Yojana
Maharashtra Weather Forecast: राज्यासाठी पुढचे २४ तास धोक्याचे; मुंबईसह या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

केद्रांच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.  (Latest Marathi News)

Namo Shetkari Yojana
Cm Eknath Shinde On Building Audits : धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

योजनेसाठी कोण असतील पात्र?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. टॅक्स भरणारे, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकरी यांच्या व्यतिरिक्त सर्वांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com