महाराष्ट्रात सध्या ईडीचं सरकार; नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

हे सरकार केंद्रातील महाशक्तीच्या आधारे स्थापन केलं आहे. महिनाभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तारही करू शकले नाहीत.
Nana Patole
Nana PatoleSaam TV

सिद्धेश म्हात्रे -

नवी मुंबई: महाराष्ट्रात सध्या ईडीचे सरकार सत्तेत आलं आहे. आता ते शब्दांचे बाण सोडून फक्त जनतेचा मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर केली. (Shinde-Fadnavis Governmet) ते आज नवी मुंबई (Navi Mumbai) येथे बोलत होते.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले, हे सरकार केंद्रातील महाशक्तीच्या आधारे स्थापन केलं आहे. महिनाभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तारही करू शकले नाहीत, दोघेच राज्य चालवत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार (MVA Goverment) पाडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला.

पाहा व्हिडीओ -

त्यावेळी शब्दाचे बाण फेकून आणि केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करून महाराष्ट्राची सत्ता पाडली. त्यानंतर महाराष्ट्रात ईडीचे सरकार आले, आताही शब्दांचे बाण सोडून जनतेचा मनोरंजन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका पटोले यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला आहे, १० लाख हेक्टच्यावरती शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. जनावरे देखील वाहून गेली आहेत. ईडी सरकारने शब्दाचे बाण फेकून मनोरंजन करण्यापेक्षा मदत करावी असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. शिवाय कोण पक्षप्रमुख आहे की नाही, याच कोणालाच घेणं देणं नाही त्यामुळे या शब्दकडे लक्ष देण्याचे कारण नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com