Nana Patole News : राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याने काँग्रेस आक्रमक; भरपावसात बसून सत्याग्रह आंदोलन, नाना पटोले म्हणाले...

महाराष्ट्र काँग्रेसनेही मोदी सरकारविरोधात भरपावसात सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
Nana Patole News
Nana Patole News Saam tv

Nagpur News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासरदारकी रद्द करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसनेही मोदी सरकारविरोधात भरपावसात सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. यावेळी 'निसर्गही आता काँग्रेससोबत आहे,असे म्हणत नाना पटोले यांनी निसर्गाचे आभार मानले. (Latest Marathi News)

नागपुरात जोरदार पाऊस झाला या परिस्थितीत काँग्रेसचं (Congress) आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पावसात भिजत सत्याग्रह आंदोलनात बसून राहिले आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार नागपुरात आज जोरदार पाऊस झाला आणि या पावसातही काँग्रेस नेत्यांचे आंदोलन सुरूच आहे. या पावसात बसून राहत राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, या आशयाचे नारे नेत्यांकडून दिले जात आहेत.

Nana Patole News
भाजप विरोधात Congress पक्षाचं सत्याग्रह आंदोलन! पाहा कुठे आहेत आंदोलन?

यावेळी नाना पटोले म्हणाले, 'निसर्ग आता काँग्रेससोबत आहे. याआधी देखील होता. जनतेला खोटं स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आलं. या जुलमी सत्तेच्या विरोधात महात्मा गांधी यांच्या विचाराने देशभरात सत्याग्रह आंदोलन देशभरात सुरू केलं आहे. ललित मोदी, निरव मोदी, गौतम अदानी आणि मेहुल चौक्सी यांना चोर म्हणणे देशात गुन्हा ठरवला जातोय. या चोरांना आम्ही चोर म्हणू. आम्हालाही यांनी गुन्हेगार ठरवावं'.

Nana Patole News
Ajit Pawar यांनी दिला विद्यार्थांना सल्ला! मित्र मैत्रिणी निवडताना काळजी घ्या !

'जनतेचे पैसे लुटून पळणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात ही लढाई आहे. या लढाईला आम्ही जिंकू. पावसाच्या हजेरीने आम्हाला शक्तीशाली बनवलं आहे. त्यामुळे त्याचेही धन्यवाद, असेही नाना पटोले (Nana Patole) पुढे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com