'भाजपने महाराष्ट्राची बदनामी थांबवावी; जनता खपवून घेणार नाही'

महाराष्ट्र सरकारला देखील कॉंग्रेसच्या वतीने व्हॅट कमी करून राज्याच्या जनतेला दिलासा दयावा अशी विनंती करण्यात आल्याचे पटोले यांनी नमूद केले.
'भाजपने महाराष्ट्राची बदनामी थांबवावी; जनता खपवून घेणार नाही'
congress protest in kalyan

कल्याण : देशात वाढलेले पेट्रोल डिझेल ,गॅसचे दर, वाढलेली महागाई ,बेरोजगारीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसतर्फे आज (रविवार) कल्याण (kalyan) येथे जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यासह शेकडो कॉग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजप सरकारच्या काळात जनतेची लूट सुरू असून ही जनजागरण मोहीम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवली जात आहे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचे पटोले यांनी नमूद केले.

congress protest in kalyan
काँग्रेस 'एकला चलो रे' भूमिकेत; 'महाविकास' ची बिघाडीची शक्यता

पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले मुबंईत झालेल्या क्रूज पार्टीत भाजपचाच हात असल्याचे काँग्रेसने या आगोदर ही सांगितलेले होते. भाजपची लोक त्यामध्ये आहेत आणि तसेच भाजपने ठरवून हे प्रकरण केलेले आहे. जेव्हा जेव्हा उत्तरप्रदेश असो किंवा इतर राज्यात निवडणुका येत असतात तेव्हा भाजप महाराष्ट्राला प्रचाराचे साधन निर्माण करून बदनाम करत असते. हे बिहारच्या निवडणूकीत दिसले आणि सुशांत सिंग राजपूतच प्रकरण बाहेर काढले होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप ड्रग्सचे प्रकरण लावून धरत आहे असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

पटाेले म्हणाले केंद्रीय यंत्रणाचा वापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सातत्याने हाेऊ लागले आहे. वानखडे प्रकणात हे सिद्ध झालेले आहे. तातडीने केंद्र सरकारने महाराष्ट्र बदनाम करण्याचे काम थांबवावे. महाराष्ट्रच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केले तर ते महाराष्ट्रची जनता खपवून घेणार नाही.

कोरोनाच्या महामारी नंतर आर्थिक कमजोरी देशात आली आहे. त्यांनतर सुध्दा भाजपने जीवनश्यावक वस्तूच्या किमती वाढवून जनतेचे खिसे कापण्याचे काम सुरू केले आहे. ६० रुपये पेट्रोल व डिझेलवर केंद्र सरकार शेषच्या रुपात जनतेची लूट करत आहे. ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे सरकार आहे, त्याठिकाणी व्हॅटचे दर कमी करून राज्यातील जनतेला मदत करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला देखील कॉंग्रेसच्या वतीने व्हॅट कमी करून राज्याच्या जनतेला दिलासा दयावा अशी विनंती करण्यात आल्याचे पटोले यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com