अमृता फडणवीस आमच्या सुनेसारख्या; नाना पाटोलेंचा 'वसुली'वरून टोला
अमृता फडणवीस आमच्या सुनेसारख्या; नाना पाटोलेंचा वसुलीवरून टोलाSaamTv

अमृता फडणवीस आमच्या सुनेसारख्या; नाना पाटोलेंचा 'वसुली'वरून टोला

आज महाविकास आघाडी च्या वतीने पुकारलेल्या बंदला जनतेने प्रतिसाद दिला. मात्र भाजप ने बंद ला विरोध केला आहे.

रामनाथ दवणे

मुंबई : आज महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला Maharashtra Bandh जनतेने प्रतिसाद दिला. मात्र भाजप BJP ने बंद ला विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या हत्येला भाजप समर्थन करत असेल तर त्यांचा आम्ही त्यांचा करतो. त्यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बंदला विरोध केला, तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी सुद्धा महाराष्ट्र बंदच्या विरोध केला आहे.

हे देखील पहा-

ते आज म्हणाले, ते महाराष्ट्र भाजप नेते यांचा बंद ला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. रस्त्यावर भाजप उतरले नाही म्हणून त्यांना बंद कळला नसेल. मागच्या वर्षी नैसर्गिक आपत्ती झाली त्याची पाहणी करायला केंद्राची टीम आता आली आहे. मराठवाडा, विदर्भ येथील अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. बंद साठी जबरदस्ती झाली असेल त्याचे काँग्रेस समर्थन करत नाही. हा सरकरचा बंद नव्हता हा पक्षीय बंद होता.

विरोधक जो आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही. ज्या कोणी जाळपोळ आणि बस ची तोडफोड केली त्याचे आम्ही समर्थन करत नाही. वसुलीची जाणीव अमृता फडणवीस यांना अधिक असेल. त्या माझ्या सुने प्रमाणे आहेत.

अमृता फडणवीस आमच्या सुनेसारख्या; नाना पाटोलेंचा वसुलीवरून टोला
आज वसुली चालू आहे की बंद?; अमृता फडणवीसांच खोचक ट्विट

...असं राजकारण भाजप करतं;

महाराष्ट्राला, राजस्थान, दिल्ली ला कोळसा द्यायचा नाही हे केंद्रसरकरची भूमिका आहे. महाराष्ट्रात 19 संच बंद पडले आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री म्हणतात की वीजपुरवठा पुरेसा आहे आमचे अधिकारी मंत्री अनेकदा मागणी करतात पण पावसामुळे कोळसा मिळत नाही असं उत्तर दिलं जात. लोकांना त्रास होईल असं राजकारण भाजप करतं.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.