...त्यामुळे आम्ही बारामतीला गेलो तर शरद पवारांनाही अडचण नसावी; पवारांच्या दौऱ्यावर पटोलेंचं वक्तव्य

आम्ही कधी कोणाच्या दौऱ्यावरती आक्षेप घेतला नाही ते बारामतीला येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांना बारामतीला यायचं असेल, अनेकजण येतात बारामतीला येतात - जयंत पाटील
Sharad Pawar/ Nana Patole
Sharad Pawar/ Nana PatoleSaamTV

सुशांत सावंत -

मुंबई : आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विधान परिषदेची पोट निवडणुक आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरती त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असल्याचे पटोलेंनी माध्यमांना सांगितलं. (Nana Patole's statement on Sharad Pawar's visit-

हे देखील पहा -

तसेच निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. त्यामुळे ही निवडणूक देखील बिनविरोध व्हावी अशी बोलणी केली असून यावरती देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षात चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती पटोलेंनी दिली. तसेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांचे मत मांडले, आम्ही मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पटोले म्हणाले.

Sharad Pawar/ Nana Patole
अल्पवयीन मुलांचे कपडे न काढता खाजगी अवयव पकडणे लैंगिक अत्याचारच : SC चे स्पष्टीकरण

बारामतीला येणार असतील तर स्वागत -

तसेच पटोलेंना शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या नागपूर दौऱ्याबद्दल (Nagpur Visit) विचारलं असता पटोले म्हणाले ते 'आम्हाला काही अडचण नाही. सर्वानी आपला पक्ष वाढवावा. आम्ही बारामतीमध्ये (Baramati) गेलो तर त्यांना अडचण नसावी.' असं देखील ते यावेळी म्हणाले. तर नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणले 'आम्ही कधी कोणाच्या दौऱ्यावरती आक्षेप घेतला नाही ते बारामतीला येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांना बारामतीला यायचं असेल, अनेकजण येतात बारामतीला येतात असा टोला देखील त्यांनी लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com