नारायण राणे 'कोंबडी चोर'; दादरमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी

मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले
नारायण राणे 'कोंबडी चोर'; दादरमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी
नारायण राणे 'कोंबडी चोर'; दादरमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजीरश्मी पुराणिक

रश्मी पुराणिक

मुंबई - महाड येथील पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्यावर टीका केली. स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत ज्यांना स्वातंत्र्यदिन कितवा आहे हे माहित नाही, अशा माणसांबद्दल काय बोलावं? असे सांगत नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

आता नारायण राणे यांच्या या वक्तव्या विरोधात दादरमध्ये शिवसैनिकांनी पोस्टरबाजी केली आहे.दादरमध्ये 'कोंबडी चोर' चे पोस्टर लावत शिवसैनिकांनी पोस्टरबाजी केली. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचे आणखी तीव्र पडसाद उमटण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा -

स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात हे बॅनर लावले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासात हे बॅनर काढले आहेत. राणेंविरोधात लावलेले हे बॅनर जरी काढले असले तरीही याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिक, महाडमध्ये आणि त्यानंतर पुण्यात राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये Nashik नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत Police नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक Arrested करण्यात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. तर पुण्यात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये रोहित कदम यांनी गुन्हा दाखल केला आहे.

नारायण राणे 'कोंबडी चोर'; दादरमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी
सावधान, डेल्टा प्लसचा धोका वाढतोय !

काय म्हणाले होते नारायण राणे?

ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. त्यांना कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखाली वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com