पंतप्रधानांची देहू वारी; मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाला येणार नरेंद्र मोदी

काही दिवसांपूर्वी आचार्य तुषार भोसलेंसह देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिलं होतं.
पंतप्रधानांची देहू वारी; मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाला येणार नरेंद्र मोदी
Narendra ModiSaam TV

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १४ जून रोजी येणार देहूत येणार असून पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार असल्याची माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारलं असून १४ जूनला पंतप्रधान देहूत येणार असल्याची माहिती आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की," महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण, इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण!" असं ट्विट (Tweet) त्यांनी केलं आहे.

दरम्यान, या वर्षीची आषाढी वारी (Ashadhi Wari) तोंडावर आली असताना मोदींचा हा देहू दौरा महत्वपुर्ण ठरणार आहे. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २० जूनला देहूतून निघणार आहे. त्याच्या आधी मोदी देहू दौरा करणार आहेत. मागील २ वर्षांपासून कोरोना महामारीमुळे वारकऱ्यांसमवेत पालखी सोहळे काढण्यात आले नव्हते. मात्र, यावर्षी सर्व पालख्या वारकऱ्यांसमवेत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान करणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com