
Ajit Pawar News : ज्यांनी स्वत:च्या काकांच्या पाठीत खंजीर खूपसून पहाटेच्या वेळीस शपथविधी करणा-या आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत आमदार राेहित पवार (rohit pawar) यांना पाडा असा निराेप देणा-या गद्दारी विषयी बाेलू नये नंतर आमच्यावर टीका करा असा इशारा ठाण्याचे माजी महापाैर नरेश म्हस्के (naresh mashke) यांनी विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांना दिला आहे. (Breaking Marathi News)
अजित दादांनी याचे सुद्धा उत्तर द्यावे त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला जातो. जयंत पाटील यांचा देखील बॅनर लावला गेला. सुप्रिया सुळे यांचा पण लावला गेला. नक्की तीन तीन मुख्यमंत्री करणार आहात का महाराष्ट्राचे. आधी पक्षात एकमत करा आणि नंतर स्वप्न रंगवा असा टाेला नरेश म्हस्केंनी अजित पवार यांच्या बॅनरवरुन लावला.
एमसीएच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याकरिता कोणा कोणाला आपण फोन केले होते असा सवाल म्हकेंनी यांनी अजित पवार यांनी राेहित पवार यांचा पराभव व्हावा यासाठी कोणा कोणाला निरोप दिले होते याची कल्पना दादांनीच लोकांना द्यावे आणि नंतर आमच्यावर गद्दार म्हणून टीका करावी असा इशारा नरेश म्हस्केंनी अजित पवार यांना दिला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.