Nashik News: नाशिकच्या वणीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला; अपघातात ३० हून अधिक भाविक जखमी

नाशिकच्या वणी गडावर भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे.
Nashik News
Nashik News Saam Tv

Nashik Accident News : नाशिकच्या वणी येथून अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. नाशिकच्या वणी गडावर भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

Nashik News
Akola News: घरकुलाला हप्‍ता बँकेतून काढला; रस्‍त्‍यात गाठून महिलेला गंडवलेल्‍या तोतया बँक मॅनेजर ताब्‍यात

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या (Nashik) वणी गडावर भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. अपघातात ३० हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी असलेले सगळे भाविक मालेगावच्या दाभाडीचे आहेत. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटले. त्यानंतर हा भीषण अपघात झाला.

सर्व भाविक हे मालवाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात होते. याचदरम्यान, पिकअप वाहन उलटून अपघात झाला. या अपघातात ३० हून अधिक भाविक जखमी झाले. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Nashik News
Accident News: तीन कार, ट्रकचा विचित्र अपघात; कारमधील चार जण जखमी

औरंगाबादेत नवस फेडून येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात

औरंगाबादमधून (Aurangabad) रस्ते अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. औरंगाबाद नगर हायवे वरून भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने एका दुचाकीस्वारास आणि नवस फेडून येणाऱ्या भाविकांच्या पिकअप लोडींग टेम्पोला जोरदार धडक दिली. तीन वाहनांच्या झालेल्या या विचित्र अपघातात दुचाकी वरील दोन आणि टेम्पो मधील चार असे सहा जण जखमी झाले. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही.याप्रकरणी टेम्पो चालक भास्करचव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कार चालकाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com