नथुराम गोडसे बारामतीचे होते, म्हणजे पुर्ण बारामती चुकली का? - सुधीर मुनगंटीवार

दंगलीत भाजपचा कोण असेल तर त्यालाही ठेचून काढलं पाहिजे, एखाद्या पक्षाचा व्यक्ती चुकला तर तो संपुर्ण पक्ष चुकीचा का? असंही सुधीरभाऊ म्हणाले आहेत.
नथुराम गोडसे बारामतीचे होते, म्हणजे पुर्ण बारामती चुकली का? - सुधीर मुनगंटीवार
नथुराम गोडसे बारामतीचे होते, म्हणजे पुर्ण बारामती चुकली का? - सुधीर मुनगंटीवारSaam TV

मुंबई: पक्षातील एखादा माणूस चुकला म्हणजे काय सर्व पक्ष चुकीचा असतो का? नथुराम गोडसे बारामतीचे होते, म्हणजे काय पुर्ण बारामती चुकली का? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उग्दार काढले आहेत. (Nathuram Godse was from Baramati, so why do you think the whole Baramati is wrong? said Sudhir Mungantiwar)

हे देखील पहा -

मराठा आरक्षणाबाबत बोलत असताना मुनगंटीवार म्हणाले की, ४७ वर्ष २ महिने १ दिवस कॉंग्रेसचं सरकार होतं. मात्र तेव्हा तुम्ही आरक्षण दिलं नाही, देवेंद्रजींनी दिलं ते तुम्ही टिकवलं नाही आणि वरुन आम्हाला दोष देतात ही कोणती वृत्ती आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर अमरावतीतील हिंसाचाराबाबत झालेल्या आरोपांवर मुनगंटीवार म्हणाले की, पोलिस महासंचालकांसोबत बैठक घ्या आणि हे पिल्लू (दंगलखोर) ठेचून टाका. तुम्ही तर वाघ मारायचं आव्हान करतात मग अशी उंदराची पिल्लं (दंगलखोर) ठेचायला काय अडचण आहे तुम्हाला? तुमची शक्ती गेली की, सरकारला लखवा मारला असा टोला त्यांनी लगावला.

नथुराम गोडसे बारामतीचे होते, म्हणजे पुर्ण बारामती चुकली का? - सुधीर मुनगंटीवार
गांधींच्या गुजरातमध्ये गोडसेचा पुतळा हिंदू सेनेनं स्थापन केला; कॉंग्रेसनं तोडला!

पुढे ते म्हणाले की, दंगे करणारे समजा भाजपचे आहेत, तुमच्याकडे माहिती आहे तर पोलिस महासंचालकांनी यांना ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. भाजपचा असला म्हणून काय झालं, त्याला काय कवच-कुंडल आहे का? दंगलीत भाजपचा कोण असेल तर त्यालाही ठेचून काढलं पाहिजे यात वाद असण्याचं कारण काय? एखाद्या पक्षाचा व्यक्ती चुकला तर तो संपुर्ण पक्ष चुकीचा का, म्हणजे मग नथुराम गोडसे बारामतीचे होते मग काय पुर्ण बारामती चुकली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com