केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात आज देशव्यापी संप

संपात बारामती औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग
Baramati News
Baramati Newsमंगेश कचरे

बारामती - केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात आज देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संपात बारामती (Baramati) औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या संपात बारामती एमआयडीसी मधील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारने (Central Government) प्रस्तावित केलेले कामगार कायदे रद्द करावे या मागणीसाठी कामगारांनी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढला होता.

हे देखील पहा -

सोबत अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर देखील या संपात सहभागी झाल्या होत्या. अशा वर्कर यांना 10 हजार, अंगणवाडी सेविकांना 18 हजार तर मदतनीस यांना 15 हजार मासिक मानधन मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. आशा वर्कर यांना सध्या 4 हजार, अंगणवाडी सेविका 8 हजार 500 आणि मदतनीस यांना 4 हजार 500 मानधन देण्यात येत आहे.

Baramati News
अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल खरेदीसाठी अदानी, टाटासह 54 कंपन्यांनी लावली बोली

जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एप्रिल महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. या सर्व कामगारांनी बारामतीतील प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. सोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगार धोरणाचा निषेध करत घोषणाबाजी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com