नवी मुंबईतील 'चॅम्पियन' डान्स बारचा पर्दाफाश
नवी मुंबईतील 'चॅम्पियन' डान्स बारचा पर्दाफाशSaam Tv

नवी मुंबईतील 'चॅम्पियन' डान्स बारचा पर्दाफाश

पनवेल नवी मुंबई परिसरामध्ये रात्रभर डान्स बारचा धिंगाणा

नवी मुंबई - एपीएमसी पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला चॅम्पियन डान्सबार राजरोसपणे सुरू असल्याचे एका स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. चॅम्पियन बार मालकाने सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले सर्व नियम पायदळी तुडवलेत. रात्रभर बार चालवत बारच्या दुनियेत आपणच चॅम्पियन असल्याची टिमकी मिरवत चॅम्पियन बार मालकानं पोलीस-पालिका प्रशासनाच्या कानशिलात लगावली आहे.

हे देखील पहा -

रात्री अकरा साडेअकराला बारचा मेन डोअर बंद करत बॅक डोअरने ग्राहकांना एन्ट्री देत चॅम्पियन बार सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतो. कोणाचीही विचारपूस न करता सरसकट सगळ्यांना या बारमध्ये रात्रभर एंट्री दिली जातेय. यावरून हा बार मालक पोलीस पालिकेसह सर्वच सरकारी प्रशासन यंत्रणा आपल्या खिशात घेऊन फिरत तर नाहीना असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कोर्टानं दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे  केवळ गाणी ऐकवने आणि दारु सर्व्ह करने तेही वेळेच्या बंधनात राहून एवढीच परवानगी असताना.

नवी मुंबईतील 'चॅम्पियन' डान्स बारचा पर्दाफाश
एसटी कर्मचाऱ्यांनी‌ टोकाची भूमिका घेऊ नये- अजित पवार

चॅम्पियन बारमध्ये कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे. एकीकडे सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभावित कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी मंदिरे, दुकानं, परिवहन व्यवस्था, जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर तसेच सर्वसामान्यांवर कडक निर्बंध लादत आहेत. तर दुसरीकडे चॅम्पियन बार मध्ये मात्र दिवाळी सुरू आहे. पैशांची अवैध उधळण केली जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला जात आहे. या स्टिंग ऑपरेशनमुळे सरकारचे अपयश आणि पोलीस मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. पनवेल नवी मुंबई या भागामध्ये रात्रभर डान्स बार सुरू असल्याने पोलीस प्रशासन नेमकी काय करतोय हाच प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com