मतदार यादीत घोळ! भाजपचा निवडणूक अधिकार्‍यांना घेराव

तीन दिवसात सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा
मतदार यादीत घोळ! भाजपचा निवडणूक अधिकार्‍यांना घेराव
Navi Mumbai विकास मिरगणे

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेची (Navi Mumabi Municipal Corporation) कोरोनामुळे (Corona) लांबणीवर पडलेली निवडणूक (Election) येत्या मार्च अखेरीस होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर 5 जानेवारी 2022 रोजी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. (Navi Mumabi Latest News)

हे देखील पहा -

परंतु निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसविल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ऐरोली विभाग कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना घेराव घातला.

Navi Mumbai
India Corona Update: देशात 3 लाख 47 हजार 254 नवे रुग्ण; 703 जणांचा मृत्यू

मतदार यादीतील बोगस नावे दूर करा, नव्याने मतदार यादी जाहीर करा, ज्या मतदारांची नावे इतर ठिकाणी आहेत त्यांची नावे वेगळा अशी मागणी करत येत्या सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाने जर यावर निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.