मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा; पोलिसाची कॉलर पकडली, VIDEO व्हायरल

माहितीनुसार सदरील प्रकार सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा; पोलिसाची कॉलर पकडली, VIDEO व्हायरल
Sanpada drunk lady CrimeSaam TV

नवी मुंबई : मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घालत असलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवी मुंबईतील असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडिओत एक तरुणी मद्यपान केलेल्या अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घालताना दिसून येत आहे. इतकंच नाही तर, या तरुणीने पोलिसांसोबतही हुज्जत घातली आहे. माहितीनुसार सदरील प्रकार सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. (Navi Mumbai Sanpada Drunk Lady Viral Video)

Sanpada drunk lady Crime
सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; शेतीच्या वादातून त्याने चक्क मोठ्या भावाला संपवलं

मद्यधुंद अवस्थेत असलेली ही तरुणी एका बारच्या बाहेर धिंगाणा घालतांना व्हिडिओत दिसत आहे. दारूच्या नशेत टुल्ल झालेल्या या तरुणीला आपण काय करतोय याचे देखील भान राहिलेलं नाही. तरुणीसोबत असलेली दुसरी तरुणी तिला आवरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील ही तरुणी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची माहिती अद्यापही समोर आली नाही. मात्र, हा सर्व प्रकार नवी मुंबईतील सानपाडा परिसरात घडल्याचं सांगितलं जातंय.

Sanpada drunk lady Crime
मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र; पुण्यात खळबळ

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तरुणीला शिवीगाळ करताना दिसत आहे. त्याचवेळी ती रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना देखील अडवण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर, ती भररस्त्यात लोटांगण घेत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणीला बघण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.

तरुणीला समजवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सुद्धा ती शिवीगाळ करत असल्याचं व्हिडिओतून समोर आलं आहे. एका पोलीस कॉंस्टेबलची कॉलर सुद्धा या तरुणीने पकडली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार समोर येताच पोलिसांनी या तरुणीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com