नवी मुंबईला सावत्रपणाची वागणूक का देता? गणेश नाईक यांचा सवाल

मालमत्ताकर माफीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करा; आमदार गणेश नाईक यांची राज्य शासनाकडे मागणी
नवी मुंबईला सावत्रपणाची वागणूक का देता? गणेश नाईक यांचा सवाल
नवी मुंबईला सावत्रपणाची वागणूक का देता? गणेश नाईक यांचा सवाल Saam Tv

नवी मुंबई - आमदार गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पाचशे 500 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंत मालमत्ता करमाफी आणि मालमत्ता कर सवलतीचा ठराव करून अंतिम मंजुरीसाठी तो शासनाला पाठवला होता. मुंबई महापालिकेला मालमत्ता कर माफीसाठी तत्परतेने हिरवा कंदील दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर्जमाफीचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित ठेवला आहे. नवी मुंबईला सावत्रपणाची वागणूक का देता? असा सवाल करीत आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कर माफीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मालमत्ता करमाफी आणि मालमत्ता सवलतीचा ठराव 19 जुलै 2019 रोजी नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. या अंतर्गत 500 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंत संपूर्ण मालमत्ता कर माफी देण्याचा निर्णय झाला होता. 501 ते 700 चौरस फूट क्षेत्रफळा पर्यंतच्या घरांना 60 टक्के सवलत मालमत्ता करात देण्याचे ठरले होते. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या या ठरावामुळे नवी मुंबईतील कमी उत्पन्न गटाच्या सुमारे सव्वा लाख नागरिकांना कोरोनाच्या आपत्ती काळात करदिलासा मिळणार होता.

मात्र हा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवून अनेक महिने उलटून गेले आहेत. तरीदेखील लोकहिताच्या या प्रस्तावावर शासनाने आतापर्यंत निर्णय घेतला नाही. दुसरीकडे मुंबई महापालिकेने मालमत्ता कर माफीचा जो प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता त्यावर मात्र मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवून त्यास मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर मुंबई महापालिकेच्या ‌ प्रस्तावाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश देखील दिले आहेत.

वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे. शासनाकडे नवी मुंबई महापालिकेच्या कर्जमाफीच्या आणि करसवलती च्या प्रस्तावाबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही नवी मुंबई महापालिकेच्या कर माफी व कर सवलत प्रस्तावावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर माफीच्या प्रस्तावावर तत्परता दाखवून मंजुरीचा निर्णय घेण्यात आला आणि तो मुख्यमंत्र्यांकडून जाहीरही करण्यात आला. त्याच धर्तीवर शासनाने नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर माफीचा व मालमत्ता कर सवलतीचा प्रस्ताव विनाविलंब मंजूर करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज पाठवलेल्या पत्रात केली आहे.

नवी मुंबईला सावत्रपणाची वागणूक का देता? गणेश नाईक यांचा सवाल
Corona Vaccination: आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री राज्यमंत्री तनपुरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, नगर विकास खात्याचे प्रधान सचिव यांनादेखील या विषयाचे पत्र पाठवून नवी मुंबईच्या हिताचा मालमत्ता कर माफी व कर सवलतीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com