काँग्रेसचा स्वबळाचा नारा; काँग्रेसच्या निर्णयाचा फायदाच, शिवसेना-राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

काँग्रेस महाविकास आघाडी (MVA) मधून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsena-NCP) पक्षाला कोणताही फरक जाणवणार नसून उलट, या निर्णयामुळे आम्हाला फायदाच होणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.
 काँग्रेसचा स्वबळाचा नारा; काँग्रेसच्या निर्णयाचा फायदाच, शिवसेना-राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
काँग्रेसचा स्वबळाचा नारा; काँग्रेसच्या निर्णयाचा फायदाच, शिवसेना-राष्ट्रवादीची प्रतिक्रियाSaam TV

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्याने सध्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण 2015 साली झालेल्या निवडणुकीत 10 जागा जिंकत काँग्रेसने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र आता पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असून काँग्रेस मधून निवडून आलेल्या 10 नगरसेवकांपैकी 5 जणांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. असे असले तरी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी तरी सध्या महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

 काँग्रेसचा स्वबळाचा नारा; काँग्रेसच्या निर्णयाचा फायदाच, शिवसेना-राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
Covid परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; काँग्रेस खासदारांचा घरचा आहेर

मात्र काँग्रेस महाविकास आघाडी (MVA) मधून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsena-NCP) पक्षाला कोणताही फरक जाणवणार नसून उलट या निर्णयामुळे आम्हाला फायदाच होणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.

हे देखील पहा -

3 चाकांची रिक्षा, 2 चाकांची सायकल झाली

काँग्रेसच्या (Congress) या निर्णयावर भाजपाने मात्र मिश्किल टिप्पणी करत 3 चाकांची रिक्षा आता 2 चाकांची सायकल झाली असून पुढे ती देखील तुटणार असल्याचा खोचक टोला लगावला आहे. एकूणच काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे मात्र ही घोषणा वरिष्ठांच्या दबावाखाली केल्याचे चित्र सध्या पहायला मिळत असून या निर्णयाने काँग्रेस वाढेल की उरलेली ताकदही गमावेल हे निवडणुकांच्या निकालानंतरच कळेल.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com