
- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : नवी मुंबई पोलिसांतर्फे गणेशोत्सव मंडळ (ganeshotsav 2023) आणि मुस्लिम धर्मगुरूं सोबत आयोजित करण्यात आलेली शांतता समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. (Maharashtra News)
वाशी येथील मराठी साहित्य मंदिर सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवी मुंबई परिमंडळ एक विभागातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच मुस्लिम धर्मगुरूंना बोलाविण्यात आले होते.
पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करा
यामध्ये शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गणेशोत्सव मंडळांनी आक्षेपार्ह देखावे उभारू नये तसेच प्रक्षोभक पोस्टर्स लावू नये अशा सूचना करण्यात आल्या. यासोबतच पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करावी. प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा (ganpati festival 2023 marathi news) करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मुस्लिम धर्मगुरूंनी 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी असल्याने आपली ईद-ए-मिलादची (eid e milad 2023) मिरवणूक दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबरला काढण्यात यावी असे आवाहन प्रशासनाने केले.
ईद-ए-मिलादचा जुलुस 29 सप्टेंबरला
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन मुस्लिम धर्मगुरूंनी ईद-ए-मिलादचा जुलुस 29 सप्टेंबरला काढू असे म्हटले. या शांतता समितीच्या बैठकीस नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त श्रीराम पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.