Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अडीच कोटीचे ड्रग्ज जप्त

वर्ष 2021 ची सांगता होण्यापूर्वी आणि नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे.
नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाईSaam TV

नवी मुंबई : वर्ष 2021 ची सांगता होण्यापूर्वी आणि नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीये. तसेच, त्यांच्याजवळ असलेले 2 किलो 500 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. ज्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याची माहिती आहे. (Navi Mumbai Police Arrest 3 Drugs Peddlers And MD Drugs Of Two And Half Crore Seized)

नववर्ष सुरु होण्यापूर्वी शहरात तसेच शहराबाहेर पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा वापर नशा करण्यासाठी केला जातो. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्तचरामार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलीपदार्थविरोधी कक्ष आणि अनैतिक मानवी वापर प्रतिबंध प-कक्ष यांच्या संयुक्त तपास पथकाने पनवेल तालुक्यातील नेरे येथून जाकीर अफरोज पिट्टू या 33 वर्षीय तरुणाला अटक केली. तसेच सुभाष रघुपती पाटील याला पेण येथून अटक केलीये.

हेही वाचा -

नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
पुण्यात पोलीस निरिक्षक महिला अधिकाऱ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

अटक आरोपींकडून पोलिसांनी 2 किलो 500 ग्राम एमडी ड्रॅग्ज जप्त केले. अटक आरोपीच्या चौकशीनंतर कलिंम रफिक खामकर याला पनवेल येथून अटक केलीये.

अटक आरोपीकडून मेथ्याक्युलॉन पावडर, एक मारुती स्विफ्ट गाडी अॅपल कंपनीचा मोबाईल, 5 रुपयांच्या 100 नोटा जप्त करण्यात आले. आरोपी यांच्याकडून 2 कोटी 53 लाख 70 हजार 900 रुपये किमातीचा मुद्दे माल जप्त केला आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com