Navi Mumbai Water: नवी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; मोरबे धरणात इतकाच पाणीसाठा शिल्लक, पाणीकपात होणार?

Navi Mumbai Water: नवी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणा आता केवळ 33 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Navi Mumbai Water crisis
Navi Mumbai Water crisisSaam TV

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

Navi Mumbai Water: नवी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणा आता केवळ 33 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या कालावधीत नवी मुंबई शहरात पाणी कपात होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

यंदा नवी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात गरजेपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबी धरण पूर्णपणे भरले नव्हते. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने यावेळी अवघा 33 टक्के पाणीसाठा असून, 3 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा मोरबे धरणात उपलब्ध आहे.

Navi Mumbai Water crisis
Pune Crime News: माझा पती हरवला, पुण्यातील विवाहितेची पोलिसांत धाव; तपासात पत्नीचं 'लफडं' उघड

मागील वर्षी याच कालावधीत धरणात ५४ टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ 33 टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिल्याने पावसाळा लांबणीवर गेल्यास किंवा कमी पाऊस झाल्यास पाणी कपातीच मोठं संकट नवी मुंबईकरांवर (Navi Mumbai) येईल. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नवी मुंबई मनपाकडून करण्यात येतंय.

यंदा जूनमध्ये सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यानंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला, मात्र नवी मुंबई शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर मोरबे धरण क्षेत्रात मात्र आवश्यकतेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदा मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.

Navi Mumbai Water crisis
Raigad Crime News: इंजिनिअर तरुणीने गळफास घेत संपवली जीवयात्रा; परिसरात हळहळ

सन २०२१-२२ मध्ये मोरबेत ४२२९ मि.मी पावसाची नोंद झाली, तर सन २०२२-२३ मध्ये ३५७१ मिमी पाऊस पडला. स्वतःच्या मालकीचे धरण असलेली जल संपन्न महापालिका अशी ओळख आज नवी मुंबई शहराची आहे. शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी या धरणातून प्रतिदिवस ४८८.९७ एमएलडी पाणीपुरवठा होतो. (Latest Marathi News)

नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. मागील वर्षी धरण १०० टक्के भरले होते, मात्र यावेळी धरण क्षेत्रात समानधानकारक पाऊस न पडल्याने ९५ टक्के धरण भरले होते.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com