नवनीत राणांच्या अडचणीत वाढ; डी गँगच्या कनेक्शनची पोलिसांकडून चौकशीची शक्यता

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता
Navneet Rana/ Ravi Rana, Navneet Rana Latest Marathi News
Navneet Rana/ Ravi Rana, Navneet Rana Latest Marathi NewsSaam Tv

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणा यांच्या दाऊद कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळची व्यक्ती समजली जाणारी युसूफ लकडावालाकडून ६० लाखांचे कर्ज घेण्यात आले होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या EOW कडे चौकशी करण्यात येणार आहे. (Navneet Rana Latest Marathi News)

हे देखील पाहा-

युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित असलेले नाव आहे. या गँगशी त्याच्याकडून नवनीत राणांनी ८० लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल केला आहे. संजय राऊत यांनी राणा यांचे निवडणूक (election) प्रतिज्ञापत्राचा दाखला देत हे आरोप करण्यात आले आहेत. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. ईडी (ED) या प्रकरणाचा तपास करणार का असा प्रश्न संजय राऊत यांनी केला होता.

Navneet Rana/ Ravi Rana, Navneet Rana Latest Marathi News
मुंबईत वाढले भाज्यांचे दर, गृहिणींचं कोलमडलं बजेट

यानंतर आता महाविकास आघाडीकडून राणा दाम्पत्य आणि डी गॅंगच्या संबंधाविषयी चौकशी करण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांकडे या प्रकरणाविषयी लवकरच तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर EOW कडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या EOW कडून आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी सुरू आहे. युसूफ लकडावालाचे दाऊदशी संबंध असल्याचे आणि तो डी गँगचा फायनान्सर असल्याचे सांगितले जात आहे. मनी लॉन्ड्रिंगसह पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात ईडीने त्याला अटक केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com