Navneet Rana Latest News: राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, आता BMC ने बजावली नोटीस

सध्या कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Navneet Rana Latest News: राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, आता BMC ने बजावली नोटीस
Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Ravi Rana News, Navneet Rana NewsSAAM TV

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सध्या राणा दाम्पत्य तुरुंगात असून, त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेनं (BMC) नोटीस बजावली आहे. नोटिशीनुसार, खार येथील इमारतीतील राणांच्या घरात मुंबई महापालिकेकडून पाहणी केली जाणार आहे. घरात अवैध बांधकाम केल्याचा संशय पालिका प्रशासनाला आहे. वाढीव बांधकाम आणि काही नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून महापालिकेनं ही नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी महापालिकेचे एक पथक पाहणी करण्यासाठी खार येथील त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे. (Navneet Rana Ravi Rana Latest News)

Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Ravi Rana News, Navneet Rana News
Raj Thackeray Warrant: राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट, काय आहे प्रकरण?

राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर ४ मे रोजी निर्णय

सध्या तुरुंगात असलेले नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. कोर्टात निकालाचे वाचन पूर्ण न झाल्याने राणा दाम्पत्याला दोन दिवस कोठडीतच राहावं लागलं. त्यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्याला दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Ravi Rana News, Navneet Rana News
जेलमध्ये नवाब मलिकांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य हे मुंबईत आले होते. मात्र, शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच तळ ठोकला होता. शिवसैनिकांकडूनही राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं. पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये, म्हणून पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना निवासस्थानाहून ताब्यात घेतलं होतं. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य कोठडीत आहेत.

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.