'पहिली पत्नी समोर येऊन काही बोलेल म्हणून वानखेडेंनी...; मलिकांचा दावा

समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाईत त्यांनी खोट्या जातीच्या पुराव्यांवर नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक करत आहेत.
'पहिली पत्नी समोर येऊन काही बोलेल म्हणून वानखेडेंनी...; मलिकांचा दावा
नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंबाबत नवा खुलासा!Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणापासून सुरु झालेलं ड्रग्स प्रकरण आणि यातील गौप्यस्फोटची मालिका अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सुरु केली. अनेक खळबळजनक आरोप मलिकांनी वानखेडेंवर केले आहेत. समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाईत त्यांनी खोट्या जातीच्या पुराव्यांवर नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक करत आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी वानखेडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीला फसवल्याचा खळबळजनक आरोप यावेळी केला आहे.

समीर दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येतो आहे. ते म्हणाले, ज्या महिलेला यानी घटस्फोट दिला. ती समोर येऊन काही बोलेल म्हणून तिच्या घरातल्यांच्या घरात ड्रग्ज ठेवून त्याना ही अडकवलं आहे असा आरोप मलिकांनी केला आहे. वानखेडेंनी सुरूवातीला ज्या मुलीशी लग्न केलं होतं, तिच्याशी वाद झाल्यानंतर ड्रग्ज ठेऊन तिच्या नातेवाईकांना तुरुंगात टाकल. त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आलं असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

महानगर पालिकेचे आम्ही सर्व रेकाँर्ड काढलेत ज्यात शाळा सोडल्याचा दाखला मिळाला आहे. हे सर्व पुरावे मी न्यायालयात दिले आहेत. त्यावर दुपारी २ वा. सुनावनी आहे. वानखडे यानी ज्या आयपीएस अधिकार्याच्या मुलाला अडकवलयं त्याने इमारतीती सीसीटिव्ही तपासा अशी मागणी केली. पहिली पत्नीचा चुलतभाऊ अजूनह तुरूगांत आहे.

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंबाबत नवा खुलासा!
Amravati Violence: मलिकांनी केली 'भाजप' नेत्याची Audio Clip शेअर (पहा Video)

समोर येऊन काही बोलल्यास संपूर्ण कुुटुंबाला आत टाकण्याची धमकी वानखडे यांनी दिली. न्यायालयाने एकआमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ता असताना माहिती पूर्ण काढून सोशल मिडियार वक्तव्य करायला हवीत असे बोलले. त्यानुसार मी माहिती घेऊन महत्वाचे पुरावे आम्ही सादर केले. सोबतच माझा ट्विटरवर बंदी घालण्याची मागणी त्यानी केली, समीर वानखडे बनावट नोट बनवण्याचे खिलाडी असल्याचा नवाब मलिकांचा आरोप केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com