वानखेडेंच्या आई जाहिदा यांचा ओशिवारा कब्रस्तानात दफनविधी- नवाब मलिक
वानखेडेंच्या आई जाहिदा यांचा ओशिवारा कब्रस्तानात दफनविधी- नवाब मलिक Saam Tv

वानखेडेंच्या आई जाहिदा यांचा ओशिवारा कब्रस्तानात दफनविधी- नवाब मलिक

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये वाद मागील दीड महिन्यांपासून चांगलाच सुरू आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये वाद मागील दीड महिन्यांपासून चांगलाच सुरू आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून सतत कागदोपत्री पुरावे शेअर करत वानखेडे कुटुंबीयांवर सारखे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचे सांगत मलिक यांनी त्यांच्यावर खोट्या कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे सांगितले आहे.

याविषयी, आता परत एकदा मलिकांनी समीर वानखेडेंच्या आईंशी संबंधित कागदपत्रे ट्विटरवरुन शेअर करण्यात आली आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी ४ दिवसाअगोदर मध्यरात्रीच्या सुमारास समीर वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर केला होता. यानंतर, आता मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या आईंच्या मृत्यू दाखल्याचे फोटो शेअर करत, आणखी एक फर्जीवाडा... असे म्हटले आहे.

हे देखील पहा-

अंत्यसंस्काराकरिता मुस्लीम आणि सरकारी दस्तावेजासाठी हिंदू? धन्य है दाऊद- ज्ञानदेव, असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे. मलिक यांनी ट्विटरवरुन झहीदा ज्ञानदेव यांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र शेअर करण्यात आले आहे. यामध्ये एक प्रमाणपत्र हे मुंबई महापालिकेचे आहे, तर दुसऱ्या प्रमाणपत्रामध्ये झहीदा यांचा उल्लेख हिंदू असा दिसून येत आहे.

मात्र, दोन्ही प्रमाणपत्रावर झहीदा यांच्या पतीचे नाव ज्ञानदेव वानखेडेच असल्याचे दिसून येत आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधामध्ये सार्वजनिक वक्तव्य किंवा ट्विट करण्यास सरसकट मनाई करणारा अंतरिम आदेश देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार देण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी केलेले ट्विट्स हे द्वेषातून आणि पूर्ववैमनस्यातून करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी आहेत आणि नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधामध्ये करत असलेले ट्विट हे एनसीबी विभागीय संचालकाच्या सार्वजनिक कर्तव्यांशी निगडीत आहे.

वानखेडेंच्या आई जाहिदा यांचा ओशिवारा कब्रस्तानात दफनविधी- नवाब मलिक
Railway: प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म तिकिटाच्या शुल्कात मोठी कपात

यामुळे मंत्र्यांना वानखेडे यांच्याविरोधामध्ये बोलण्यास पूर्णपणे मनाई करू शकत नाही, असे न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले आहे. नवाब मलिक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत त्याखाली कबूल है, ..कबूल है .. कबूल है..यह क्या किया तूने? असे नमूद करण्यात आले होते. या फोटोमध्ये वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसत होते.

नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर करताच, वानखेडे यांचे दुसऱ्या पत्नीसोबत हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहासहित पूजापाठ करतानाचे फोटो समोर आले आहेत. आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न केले असून, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे कुटुंबीयातील एका सदस्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com