'सत्यमेव जयते' ; अन्याया विरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार - मलिक

दरम्यान, नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणावरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष केले आहे.
'सत्यमेव जयते' ; अन्याया विरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार - मलिक
'सत्यमेव जयते' ; अन्याया विरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार - मलिक Saam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : 'सत्यमेव जयते' असं बोलत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना कुणी गैर करत असेल, कोण अन्याय करत असेल तर त्याविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार आहे असे स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. समीर वानखेडे याच्या वडिलांनी नवाब मलिक यांना कुटुंबाच्या विरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती परंतु उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्यापासून रोखता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. या देशामध्ये बोलण्यावर बंदी कुणी घालू शकत नाही. जर एखादी व्यक्ती जबाबदारीने बोलत असेल तर प्रत्येक नागरिकाचा तो मौलिक अधिकार आहे परंतु काही लोकांना हे कळलं नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

'सत्यमेव जयते' ; अन्याया विरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार - मलिक
शारीरिक संबंधाच्या हव्यासापोटी जगातील सर्वात सुंदर बीच नष्ट

दरम्यान, नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणावरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष केले आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिकांनी यांनी नवनवीन आरोप केले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी दररोज काहीतरी फोटो पोस्ट करत समीर वानखेडेंच्या नावावर शंका उपस्थीत केली. समीर वानखेडे यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे नसून समीर दाऊद वानखेडे आहे असा धक्कादायक खुलासा मलिकांनी केला. मलिकांनंतर त्यांच्या मुलीही मैदानात उतरल्या आणि त्यांनीही समीर वानखेडे यांच्या विरोधात पुरावे द्यायला सुरुवात केली.

नवाब मलिका यांच्यावरही आरोप करण्यात आले. परंतु न डगमगता नवाब मलिक रोज नवीन काहीतरी खुलासा करत आहेत. २५ कोटींच्या खंडणीसाठी आर्यन खानला अटक करण्यात आली असल्याचा प्राथमिक आरोप मलिकांनी केली. आणि मग त्यात असलेले किरण गोसावी, मनिष भानुषाली यांची नावं समोर आणली. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचीकेवरही आता पाणी फिरले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com