NCB ची कारवाई फर्जीच; माझा जावई निर्दोष- नवाब मलिक

मंत्री नबाव मलिकांनी (Nawab Malik) मागच्या पत्रकार परिषदेमध्ये NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले होते.
NCB ची कारवाई फर्जीच; माझा जावई निर्दोष- नवाब मलिक
NCB ची कारवाई फर्जीच; माझा जावई निर्दोष- नवाब मलिकSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: मंत्री नबाव मलिकांनी (Nawab Malik) मागच्या पत्रकार परिषदेमध्ये NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले होते. NCB ची कारवाई फर्जी असल्याचे ते म्हणाले होते, आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आरोप देखील केले होते. आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. सुरुवातीला त्यांनी आपले जावई समीर खान यांच्यावर एनसीबीने दाखल केलेल्या केस आणि त्यानंतर त्यांना मिळालेल्या जामीनावर स्पष्टिकरण दिलं आहे. समीर खान यांच्यावरील कारवाईमुळे समीर यांच्या पत्नी (मलिकांच्या कन्या) आणि मुलं त्रासात असल्याची माहिती नबाव मलिकांनी दिली आहे. त्या प्रकरणाचा संपुर्ण तपशील देताना त्यांनी सांगितले की ''नऊ जानेवारी रोजी करण सजलानीच्या घरी वांद्रे इथे रेड झाली. त्यानंतर NCB ने पत्रकारांना सांगितलं की 200 किलो गांजा ताब्यात घेतला आहे. त्याच दिवशी 9 जानेवारीला NCB ने पत्रकारांना गांजा फोटो आणि संबंधीत माहिती दिली. 9820111409 यावरून ब्रिटिश नागरिकाला अटक देखील करण्यात आली,आणि त्याला मिडियामधून प्रसिद्धी देण्यात आली. 9 जानेवारी रोजी अनेक ठिकाणी NCB ने रेड टाकली त्यापैकी एक होते समीर खान.

NCB ची कारवाई फर्जीच; माझा जावई निर्दोष- नवाब मलिक
बीएचआर घोटाळा : पुणे आर्थिक गुन्हेशाखेचे २८ बँकांवर पत्रबाण

समीर खान यांच्या केसचा मलिकांनी दिलेला घटनाक्रम

- 9 जानेवारी रोजी एक महिलेकडून साडे सात ग्राम गांजा पकडला त्या महिलेला जामीन दिला. त्याबाबत दिल्लीत रेड झाली. हौस ऑफ पान गुडगाव, नोएडा, समीर खान यांच्यावर रेड झाली.

- त्यानंतर यूपीमध्ये छापा टाकला, त्याबाबत NCB ने माहिती दिली. माझे जावई बांद्रा मध्ये राहतात. नऊ तारखेला आमची anniversary होती. आम्ही एकत्र जेवलो.

- 13 तारखेला मला पत्रकाराचा फोन आला तुमच्या जावयाला NCB ने समन्स बजावलं आहे.

- 12 तारखेला रात्री समीर खान यांना त्यांच्या आईच्या घरी समन्स मिळाला.

- 13 तारखेला समीर खान NCB कार्यालय पोहचले तर सगळे कॅमेरे तिथे स्वागत साठी आणि बातम्या सगळीकडे प्रसारीत झाल्या.

- त्याच संध्याकाळी मीडियाला वरुन बातम्या आल्या समीर खान यांना अटक झाली. ते ड्रग पेडलर आहे.

- त्यानंतर आम्ही (नवाब मलिकांनी) जमीन अर्ज केला. सत्र न्यायालयात जामीन फेटाळला. उच्च न्यायालयात गेलो.

- अटक झाल्यावर सहा महिन्याने NCB ने सांगितलं चार्जशीट फाईल करणार. मग आम्ही पुन्हा सत्र कोर्टात जमीन अर्ज केला. तारीख लागली की सरकारी वकील म्हणाले वेळ नाही आज नाही जमणार.

- अखेरीस जामीन मिळाला.

कोर्टाने काय माहिती दिली याबाबत नबाव मलिक काय म्हणाले?

- 200 किलो गांजा सापडला नाही.

- साडे सात ग्राम जो महिलेकडे सापडला तेवढाच गांजा सापडला.

- बाकीचे हरबल टॅबको आहे.

- मग NCB एवढी मोठी एजन्सी आहे, तर त्यांना तंबाखू आणि गांजा मध्ये फरक समजत नाही.

- घरात दोनशे किलो गांजा नव्हता तसे लोकांना फ्रेम करण्याचे काम NBC ने केले आहे. कोर्टाच्या आदेशात म्हणाले आहे की जे कलम लावले आहेत ते लागू होत नाही.

- ज्या महिलेकडे गांजा सापडला तिच्यावर केस होते तिला जामीन मिळतो.

- नवाब मलिकांनी रिया चक्रवर्तीच्या केस चा देखील उल्लेख केला आहे.

NCB ची कारवाई फर्जीच; माझा जावई निर्दोष- नवाब मलिक
पांढरं सोनं चकाकणार! दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाला 6 हजार पार भाव

नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले '' NCB ही पुर्णपणे फर्जीवाडा आहे. माझ्या जावायाच्या घरात गांजा मिळाला नाही तरी माध्यमांना सांगितलं गांजा मिळाला. काही मोजक्याच बातम्या करुन NCB लोकांना बदनाम करत आहे''. माझा जावाई निर्दोष आहे हे आज सिद्ध झालं आहे. जर चुकीचं काय असले असते तर माझ्या जावायला अटक झाली असती, असे मत मलिकांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. आता नवाब मलिक यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. चार बंदुकधारी जवान, पायलट कार अशी नवाब मालिकांना सुरक्षा असणार आहे. नवाब मालिक यांच्या घरीही चार जवान तैनात असणार, याआधी नवाब मालिकांच्या सुरक्षेत केवळ एक जवान होता, आता सुरक्षा वाढवली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.