"आ देखें ज़रा किसमें कितना है दम"; मलिकांचे दरेकरांना ओपन चॅलेंज

प्रवीण दरेकरांच्या ट्विटला नवाब मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
"आ देखें ज़रा किसमें कितना है दम"; मलिकांचे दरेकरांना ओपन चॅलेंज
"आ देखें ज़रा किसमें कितना है दम"; मलिकांचे दरेकरांना ओपन चॅलेंजSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: भाजप BJP नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. एक हजार कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला आहे. तर याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. मात्र या ट्विटला नवाब मलिक यांनी आपल्या खास शैलीत चोख उत्तर दिले आहे.

मलिकांनी दरेकरांचे ट्विट रिट्विट करून, आ देखें ज़रा किसमें कितना है दम, असे ओपन चॅलेंज दिले आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत असे चॅलेंज दिले आहे. आ देखें ज़रा किसमें कितना है दम, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रवीण दरेकर यांना टॅग देखील केलं आहे.

दरेकर काय म्हणाले होते?

प्रवीण दरेकर यांनी काल ट्विट (Pravin Darekar Tweet) करून त्याबाबतची माहिती दिली होती. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "नवाब मलिक च्या विरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे." असं ट्विट दरेकर यांनी केलं आहे.

"आ देखें ज़रा किसमें कितना है दम"; मलिकांचे दरेकरांना ओपन चॅलेंज
भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला मोठा फायदा - एलॉन मस्क

नेमकं काय आहे हे प्रकरण?

मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणी मलिक यांनी अनेक आरोप केले होते. त्यात मोहित कंबोज आणि त्यांच्या मेहुण्यावर काही आरोप मलिकांकडून करण्यात आले होते. या आरोपांमुळे माझी आणि माझ्या मेव्हण्याची बदनामी झाली आहे असा दावा, कंबोज यांनी केला आणि त्यांनी मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, क्रुझ पार्टी प्रकरणात NCB ने तब्बल 20 जणांना ताब्यात घेतले. त्यात शाहरुख खान (Shahrukh Khan) यांचा मुलगा आर्यन खानचाही (Aryan Khan) समावेश होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com