कबूल है,कबूल है,कबूल है, समीर दाऊद वानखडे ये तुने क्या किया? मालिकांचा सवाल

नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखडे यांचा पहिला निकहाचा फोटो ट्विट केला आहे.
कबूल है,कबूल है,कबूल है, समीर दाऊद वानखडे ये तुने क्या किया? मालिकांचा सवाल
कबूल है,कबूल है,कबूल है, समीर दाऊद वानखडे ये तुने क्या किया? मालिकांचा सवालtwitter

मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याच्या शक्यता आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्याबाबत त्यांनी अजून एक पुरावा समोर आणत कबूल है,कबूल है,कबूल है, समीर दाऊद वानखडे ये तुने क्या किया? असा सवाल विचारला आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखडे यांचा पहिला निकहाचा फोटो ट्विट केला आहे.त्यात वानखडे सही करताना दिसत आहेत. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात आज नवाब मलिक यांच्या विरोधात न्यानदेव वानखडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे.

वानखेडे यांनी वारंवार आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळेचे दाखले देखील काही दिवसांपूर्वी समोर आणले, ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असे दिसून येतं आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी मध्यरात्री हा बॉम्ब टाकत हा फोटो समोर आणला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आज नवाब मलिक यांच्या विरोधात ज्ञानदेव वानखडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.