समीर वानखेडे आणि काशिफ खानमध्ये काय संबंध? मलिकांच्या Screenshot ने खळबळ

समीर वानखेडे आणि काशिफ खानमध्ये काय संबंध आहेत?
समीर वानखेडे आणि काशिफ खानमध्ये काय संबंध? मलिकांच्या Screenshot ने खळबळ
समीर वानखेडे आणि काशिफ खानमध्ये काय संबंध? मलिकांच्या Screenshot ने खळबळSaam Tv

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात क्रुझ पार्टी प्रकरण गल्ली पासून दिल्ली पर्यंत चांगलंच पेटलं आहे. या पार्टी प्रकरणापासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे ट्विटरच्या माध्यमातून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे NCB Zonal Director Sameer Wankhede यांच्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. रोज नवनवे आरोप होत आहेत, विविध प्रश्न विचारले जात आहेत. तसेच आज सकाळी नवाब मलिकांनी केलेल्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आज मंत्री नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत व्हाॅट्सअप चॅटचे स्क्रिनशाॅट Screenshots Of Whats App Chat टाकले आहेत. या ट्विटमध्ये असलेले स्क्रिनशाॅट हे के.पी गोसावी आणि एका व्यक्तीच्या मधील संभाषण आहे असं दिसून येत आहे. आणि त्या संभाषणात काशिफ खानच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

ट्विटच्या माध्यमातून मलिकांनी काही प्रश्न विचारले आहेत- काशिफ खान याला कोणतेही प्रश्न का विचारण्यात आले नाहीत?, समीर वानखेडे आणि काशिफ खानमध्ये काय संबंध आहेत?, असा प्रश्न नवाब मलिकांनी या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोपांचं सत्र सुरू केलं होतं. त्यातच आज सकाळी मलिकांनी केलेल्या ट्विटची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

समीर वानखेडे आणि काशिफ खानमध्ये काय संबंध? मलिकांच्या Screenshot ने खळबळ
कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon वरून 1 टन ड्रग्सची तस्करी; रॅकेटचा पर्दाफाश!

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता दररोज काही ना काही खुलासे होत आहेत. तसेच नवाब मलिकांनीही हे प्रकरणाला चांगलंच गांभिर्याने घेतलं आहे. ते नवनवीन खुलासे करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पुढे काय होणार काय निष्पन्न होणार?, याकडे लक्ष लागलं आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com