समीर वानखेडेंचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही फर्जीवाडा - नवाब मलिक

हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना निलंबित करण्याची केली मागणी.
समीर वानखेडेंचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही फर्जीवाडा - नवाब मलिक
समीर वानखेडेंचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही फर्जीवाडा - नवाब मलिक Saam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : आर्यन खान (Aryan Khan Drug case) याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाड्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

समीर वानखेडेंचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही फर्जीवाडा - नवाब मलिक
सामना विधान परिषद निवडणूकांचा; काय आहे पक्षीय बलाबल, जाणून घ्या

मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले. आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेतील. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे अशी उधळपट्टी थांबली पाहिजे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आलीय केंद्रसरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे आणि आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com