गुजरातमध्ये 120 किलो ड्रग्ज जप्त: ‘उडता गुजरात’ म्हणत मलिकांचे ट्वीट
गुजरातमध्ये 120 किलो ड्रग्ज जप्त: ‘उडता गुजरात’ म्हणत मलिकांचे ट्वीटSaam Tv

गुजरातमध्ये 120 किलो ड्रग्ज जप्त: ‘उडता गुजरात’ म्हणत मलिकांचे ट्वीट

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुजरात मध्ये अंमली पदार्थ जप्त केले आहेत यावर एक वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे, सूचक शब्दात ट्विट केले आहे.

रश्मी पुराणिक

मुंबई: गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोरबीच्या जीनजुदा गावातून तब्बल 120 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे. गुजरात एटीएसने आतापर्यंत तब्बल 120 किलो ड्रग्ज जप्त केले आहे अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एटीएसने तब्बल 600 कोटींचं हेरॉईन जप्त केलं आहे. यावरुन राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे, उडता गुजरात असं त्यांनी आपल्या म्हटलं आहे. तसंच, त्यांनी एक सूचक इशारा दिला आहे.

आर्यन खान पार्टी प्रकरणापासून ड्रग्ज कनेक्शन आणि एसीबीची कारवाई यावर अनेक गंभीर आरोप, गौप्यस्फोट नवाब मलिक यांच्याकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये पुन्हा एकदा 600 कोटी रुपये किंमतीचे 120 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. यावरुन नवाब मलिक यांनी सूचक ट्वीट केलं आहे, ते म्हणाले, ‘पुन्हा एकदा गुजरात कनेक्शन… उडता गुजरात'.

डीआरआयने या प्रकरणात चेन्नई स्थित एक जोडपं आणि कोईमबतोरमधून एका आरोपीला अटक देखील केली होती. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. गुजरातच्या मुद्रा बंदरात दोन कंटेनरमध्ये आढळून आले होते हे अंमली पदार्थ कंदहार स्थित हसन हुसैन लिमिटेडने निर्यात केले होते. तर विजयवाडा स्थित आशी ट्रेडिंग कंपनीने हे अंमली पदार्थ आयात केले होते.

सप्टेंबर महिन्यात कच्छच्या मुद्रा बंदरातून 21 हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त;

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात कच्छच्या मुद्रा बंदरातून डीआरआयने 3 हजार किलो हेरॉईन जप्त केले होते त्याची किंमत जवळपास 21 हजार कोटींच्या घरात आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएसने ही मोठी कामगिरी केली आहे. हे अंमली पदार्थ मुद्रा बंदरातून दोन कार्गो कंटेनरच्या मदतीने भारतात आणण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणाचा संबंध इराणशी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त;

त्याचप्रकारे, या महिन्यात (ता. 11) रोजी गुजरातमध्ये Gujarat दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला होता. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. ज्यात हेरॉईन आणि एमडी या अंमली पदार्थाचा समावेश होता. यावेळेस हे ड्रग्सची तस्करी पाकिस्तानमधून समुद्रमार्गे सुरु होती. तर या प्रकरणी 3 जणांना अटक देखील करण्यात आली होती.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com