नवाब मलिकांनंतर त्यांच्या मुली मैदानात; समीर वानखडेंची केली पोलखोल

त्यामुळे नवाब मलिक यांच्या नंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी समीर वानखडे मुस्लिम असण्याबाबत ट्विटरवर पोलखोल करत ट्विट केले.
नवाब मलिकांनंतर त्यांच्या मुली मैदानात; समीर वानखडेंची केली पोलखोल
नवाब मलिकांनंतर त्यांच्या मुली मैदानात; समीर वानखडेंची केली पोलखोलSaam TV

मुंबई : नवाब मलिक यांच्या (Nawab Malik) नंतर त्यांच्या मुलींनी ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखडे (Sameer Wankhede) यांची पोलखोल केली आहे. समीर वानखडे यांच्या लग्नाची पत्रिका निलोफर खान यांनी ट्विट केली आहे. त्यात दाऊद वानखडे यांच्या मुलाचा निकाह असल्याचा उल्लेख आहे. तर नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना खान हिने समीर वानखडे यांचे लग्न प्रमाणपत्र ट्विट केले त्यात समीर वानखडे यांची बहीण साक्षीदार आहेय जीचे नाव यास्मिन अजीज खान असे नाव आहे. तर फ्लेचर पटेलचा भाऊ ग्लेन पटेल हा दुसरा साक्षीदार आहे ज्याने सही केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या नंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी समीर वानखडे मुस्लिम असण्याबाबत ट्विटरवर पोलखोल करत ट्विट केले.

आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाड्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com