NCB ची धडक कारवाई, मुंबईत गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या, १९० किलो गांजासह ४ जणांना अटक

एनसीबीने मुंबईत १९० किलो गांजासह ४ जणांना अटक केली आहे.
NCB Mumbai
NCB MumbaiSaam Tv

मुंबई: एनसीबीने (NCB) मुंबईत १९० किलो गांजासह ४ जणांना अटक केली आहे. या कारवाईत तस्करांच्या २ गाड्याही जप्त केल्या आहेत. अटक केलेले सर्व आरोपी मुंबईचे रहिवासी आहेत. मुंबईच्या विविध भागात विशेषतः मुलुंड आणि भांडुपमध्ये गेल्या ५ वर्षांपासून गांजा आणि इतर अमली पदार्थांचा पुरवठा करतात. काही दिवसांपूर्वी या टोळीने ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजाची डिलिव्हरी मागवली होती. याची कुणकुण एनसीबीला (NCB) लागली होती. त्यानुसार आरोपींच्या हालचालीवर एनसीबी लक्ष ठेवून होते.

NCB Mumbai
Sonia Gandhi-Smriti Irani: सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक; खासदारांना हस्तक्षेप करावा लागला

या माहितीनुसार एनसीबीने सापळा रचला होता. ही टोळी अंमली पदार्थांचासाठा नेत असल्याचे समोर आल्यानंतर एनसीबीने (NCB) सापळा रचून भिवंडी टोल येथून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. यावेळी त्यांच्या वाहनांची कसून झडती घेण्यात आली. गाडीमध्ये १९० किलो गांजा आढळून आला. हा गांजा कारमध्ये विशेष जागा करून लपवण्यात आला होता.

NCB Mumbai
Shivsena: भावना गवळींचे घटस्फोटीत पती शिवसेनेत; प्रशांत सुर्वेंना उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

दरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वीही अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली. ते अनुभवी तस्कर आहेत आणि गेल्या ५ वर्षांपासून अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात असल्याची माहिती समोर आली आहे.

चौकशीत आंध्र प्रदेश-ओडिशा भागातून ही औषधे आणली जात होती. हा प्रतिबंध मुंबई आणि लगतच्या अनेक स्थानिक पेडलर्सना डिलिव्हरी करण्यासाठी होता. या प्रकरणी एनसीबीने (NCB) अधिक चौकशी करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com