Mumbai Crime News : एनसीबीची मोठी कारवाई; तब्बल २८६ किलो गांजा जप्त

Mumbai NCB News : याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडीही जप्त करण्यात आली आहे.
NCB Seized 286 kg cannabis In mumbai two accused arrested crime news
NCB Seized 286 kg cannabis In mumbai two accused arrested crime newsसूरज सावंत

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. तस्करीसाठी आणलेला तब्बल २८६ किलोंचा गांजा (Cannabis) अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अर्थात एनसीबीने जप्त केला आहे. हा २८६ किलोंचा गांजा एकूण ९५ पाकिटांमध्ये भरण्यात आला होता. ही सगळी पाकिटं एनसीबीने जप्त केली आहेत. तसेच याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडीही जप्त करण्यात आली आहे. (Mumbai Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार काल, २६ जूनच्या पहाटे एनसीबी पथकाने ही कारवाई केली आहे. २६ जूनच्या पहाटे सोलापूर-मुंबई महामार्गावर एनसीबाच्या पथकाने कारवाई करत हा गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्रप्रदेश राज्यातील तेलंगणा येथून आणण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणा पोलिसांनी गांजाची ९५ पाकिटं, गुन्हात वापरलेली गाडी जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. गेल्या काही काळापासून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने महाराष्ट्रात कारावायांचा सपाटा लावला आहे. यात अनेक मोठी नावंही समोर आली होतीय. यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे बॉलिबूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचंही नाव समोर आलं होतं, मात्रं नंतर यात त्याला क्लिनचीट मिळाली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com