सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? पवारांचा CM शिंदेंना टोला

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तुफान टोलेबाजी केलीये
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV

Eknath Shinde vs Ajit Pawar : 'राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्या आहे. सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. जेव्हा पाहतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, ते ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?' असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावलाय. (Ajit Pawar Todays News)

Ajit Pawar Eknath Shinde
Funny Video : याला कुणीतरी आवरा रे! भर रस्त्यात मद्यपीचा नागिन डान्स, व्हिडीओ Viral

काय म्हणाले अजित पवार?

'आम्ही सरकारमध्ये असताना कॉंग्रेसच्या नेत्यांचं काही चुकलं तर सोनिया गांधींचा फोन आल्यावर लगेच ती चूक दुरूस्त व्हायची. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं चुकलं तर पवार साहेबांचा फोन यायचा, त्याचबरोबर शिवसेनेचं चुकलं तर उद्धव साहेबांचा फोन आल्यानंतर ती चूक दुरूस्त व्हायची. आता या दोघांच्या काळात (एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस) कुणी कुणाचं ऐकायलाच तयार नाही. ते 40 (शिंदे गटाचे आमदार) म्हणतात आम्ही सर्वच मुख्यमंत्री आहोत, अरे सर्वच मुख्यमंत्री म्हणजे अधिकाऱ्यांनी ऐकायचं कुणाचं? अधिकाऱ्यांना तर दमच देतात तुझी बदली करू, अधिकारी काय तुमचे घरगडी वाटले का'? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

'... मग मुख्यमंत्री झोपतात कधी?'

शिंदे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. आतापर्यंत एकही शेतकऱ्याला नुकसानभरपाईची मदत मिळाली नाही. महाराष्ट्रात कितीतरी घटना घडत आहे. मुख्यमंत्री विषय तिसरीकडेच घेऊन जात आहेत. जेव्हा पाहा तेव्हा ते सांगतात की मी ६ वाजेपर्यंत काम करतो. मी म्हटलं सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो तर हा माणूस उठतो कधी? आणि झोपतो कधी? असा टोलाही अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. (CM Eknath Shinde News)

Ajit Pawar Eknath Shinde
Viral : चुकून एक्सीलेटर फिरवला अन् स्कूटीवरून धाडकन आदळली तरुणी, VIDEO व्हायरल

'विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये'

वेदान्त प्रकल्पावरूनही अजित पवारांनी शिंदे सरकारला चांगलंच सुनावलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा हा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावे. हा प्रकल्प राज्यातून जात असेल, तर गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे.” रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे, असं विचारलं असता अजित पवार यांनी म्हटलं, 'तोही प्रकल्प राज्यात व्हावा. ज्यामाध्यमातून राज्याला रोजगार, गुंतवणूक, देशाला आणि राज्याला जीएसटी मिळेल, असे प्रकल्प आले पाहिजे. हे प्रकल्प येताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये,' असेही पवार यांनी ठणकावलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com