Video : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच कारमध्ये; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्षस्थानी आहेत.
Sharad Pawar And Devendra Fadnvis
Sharad Pawar And Devendra Fadnvis Saam Tv

Pune News : दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पडत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्षस्थानी आहेत.

या कार्यक्रमावेळी भारती विद्यापीठ परिसरात खासदार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या कारमधून एकत्र प्रवास करताना दिसले. दोन दिग्गज राजकीय नेत्यांच्या एकत्र प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar And Devendra Fadnvis
BhagatSingh Koshyari : राज्यपालांकडून पुन्हा एकदा महापुरुषांचा एकेरी उल्लेख; अमोल मिटकरींनी व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना विचारला 'तो' प्रश्न

आज पुण्यात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ सुरू आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार हॉस्पिटलचे उदघाटन होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.

आज पुण्यात डॅा. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॅास्पिटल आणि स्टुडंटस् हौसिंग कॅाम्पेक्सचा उद्घाटन कार्यक्रम सुरू आहे. यावेळी कांग्रेस नेते विश्वजीत कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना फडणवीस यांच्या पाया पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आहेत.

पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन्ही दिग्गज राजकीय नेते व्यासपीठावर एकत्र आले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकत्र दिसले. याबरोबर भारती विद्यापीठ परिसरात खासदार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या कारमधून एकत्र प्रवास केला. यावेळी पहिल्या आसनावर विश्वजीत कदम बसले होते. दिग्गज राजकीय नेत्यांच्या एकत्र प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar And Devendra Fadnvis
Raj Thackeray: 'सध्या कोणीही उठतो अन् इतिहासकार होतो' पुण्यात राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी, राजकीय नेत्यांना दिला 'हा' मोलाचा सल्ला

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात हा कार्यक्रम सुरु आहे. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचीही कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आहे. तसेच आदर पुनावालाही उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या एकाही नेत्याचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com