'पंढरपूरचा विठोबा समोर असेल तर...'; नास्तिकतेच्या आरोपावर शरद पवारांनी दिलं उत्तर

विठोबा समोर असेल तर मी हात जोडतो. सामान्य माणूस त्याला संकटमोचक मानतो. त्याचा अनादर करु नये म्हणून मी हात जोडतो - शरद पवार
Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv

पुणे : आस्तिक नास्तिक हा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याचा गवगवा करत नाही. पण पंढरपूरचा (Pandharpur) विठोबा समोर असेल तर मी हात जोडतो. सामान्य माणूस त्याला संकटमोचक मानतो. त्याचा अनादर करु नये म्हणून मी हात जोडतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आस्तिक-नास्तिकतेच्या प्रश्नावर उत्तर दिलं. ( Sharad Pawar Latest News In Marathi )

पुण्यात आज आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या पुढाकाराने कनेक्ट महाराष्ट्र कॅानक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत संपन्न झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत शरद पवारांवर नास्तिक असण्याचा आरोप केला होता. त्यानंतर शरद पवारांनी दगडूशेठ येथील गणपतीचे बाहेरून दर्शन घेतलं होतं. आज मुलाखतीत राज ठाकरेंच्या नास्तिकतेच्या त्याच आरोपावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी बेधडकपणे उत्तरे दिली. 'आस्तिक-नास्तिक या तपासण्या झाल्या नाहीत. त्या योग्य नाहीत. आस्तिक नास्तिक हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याचा गवगवा करत नाही.पण पंढरपूरचा विठोबा समोर असेल तर मी हात जोडतो.सामान्य माणूस त्याला संकटमोचक मानतो.त्याचा अनादर करु नये म्हणून मी हात जोडतो',असं मत शरद पवारांनी नास्तिकतेच्या आरोपावर व्यक्त केले.

Sharad Pawar
बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची हिम्मत झाली नसती : संजय राऊत

यावेळी शरद पवारांनी कश्मिर फाईल्स सिनेमा आणि काश्मीरमध्ये पंडितांच्या होणाऱ्या हत्येवरही भाष्य केलं., 'कश्मिर फाईल्स हा सिनेमा जनमानसाचा मनात खोटी प्रतिमा तयार करणासाठी तयार केलेला आहे.पंडितांची हत्या होत होती तेव्हा भाजप सरकार होतं. आजही भाजप सरकार आहे. पंडित घटकांना संरक्षण द्यायला ते कमी पडत आहेत.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com