Sharad Pawar News: नवीन संसदेच्या उद्घाटनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'विरोधकांना विश्वासात...

देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV

Sharad Pawar News: देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावरून राजकारण पेटलं आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनेवरून चांगलंच वातावरण पेटलं आहे. देशातील बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या नवीन संसदेवरून शरद पवारांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

Sharad Pawar
Karnataka Cabinet Expansion : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभरातच; २४ मंत्र्यांचा शपथविधी, मुरब्बी काँग्रेसची जबरदस्त खेळी

शरद पवार म्हणाले, 'नवीन संसदेची नवी इमारत बांधणे हे आम्ही वर्तमान पत्रात वाचले. त्यानंतर भूमिपूजन झालं, तेव्हाही आमंत्रण नाही. विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. म्हणून बहिष्कार घालण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. त्यांचा तो निर्णय आम्हाला मान्य आहे'.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. त्यानंतर आता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रियेला वेग आला आहे.

शिवसेनेची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लवकरच राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. 'याचा अर्थ निर्णय प्रक्रिया सुरू केली आहे. काय निर्णय येतो ते पाहुयात, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाला मिळाले नवे न्यायमूर्ती; पण फक्त ४ दिवसांसाठीच, कारण...

शरद पवार यांनी या समान नागरी संहितेवरही भाष्य केलं. 'समान नागरी संहितेसंबंधित बातम्या खोट्या आहेत. या प्रकरणात असं काही झालेलं नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com