
Sharad Pawar News : केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचा मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. याचदरम्यान, या पत्रावर पहिली सही माझी आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. (Latest Marathi News)
दिल्लीत नवीन अबकारी धोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात काही दिवसांपूर्वी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मनिष सिसोदिया यांच्या अटकेवरून विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिलं.
या पत्राबाबत भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'या पत्रात पहिली सही माझी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात अशी आमची इच्छा आहे. दिल्ली सरकारचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे शिक्षण क्षेत्रातील कामांचे अनेकांनी कौतुक केले आहे'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी,दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS प्रमुख के चंद्रशेखर राव, यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray),जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापरावरून पत्र लिहून समस्या मांडल्या आहेत.
पत्रात काय लिहिलं ?
देशातील 9 विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी इडी, सीबीआय सारख्या सरकारी संस्थांचा चुकीचा वापर होत असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे सरकारी यंत्रणांची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप देखील या पत्रात करण्यात आला आहे.
पत्रात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधातील तपास संथ गतीने सुरू असल्याचे पत्रात लिहिले आहे.
तसेच राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यांमध्ये तेढ वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, २६ फेब्रुवारीला दीर्घ चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने (CBI) अटक केली. त्यांना अटक करताना त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा दाखवण्यात आला नाही, असा दावा करण्यात आला आहे. 2014 पासून ज्या नेत्यांवर कारवाई झाली, त्यापैकी बहुतांश नेते विरोधी पक्षातील आहेत'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.